परभणी जिल्ह्यात १८ वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:03 AM2018-01-16T00:03:41+5:302018-01-16T00:03:45+5:30
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ नवीन वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्त्या केल्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आता अधिक गतिमान होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवा देताना कर्मचाºयांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ नवीन वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्त्या केल्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आता अधिक गतिमान होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवा देताना कर्मचाºयांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
आरोग्य विभागातील ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती भावनाताई नखाते यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला.
जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाºयांच्या २४ पदे रिक्त आहेत. त्यापैकी १८ पदांवर नवीन अधिकाºयांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. उर्वरित सहा पदेही लवकरच भरले जातील, असे आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती भावनाताई नखाते यांनी दिली.
नव्याने मिळालेल्या नियुक्ती आदेशानुसार जांब प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ.विवेक पतंगे, ताडकळस आरोग्य केंद्रासाठी डॉ.मो.अजहर अहमद अ.अन्सारी, चाटोरी डॉ.स्मिता चव्हाण, रावराजूर डॉ.स्वप्नील जाधव, हादगाव डॉ.कपिल निकाळजे, वाघाळा डॉ.प्रसाद केंद्रेकर, देऊळगाव गात डॉ.गोविंद कदम आणि डॉ.नेहा सोन्नेकर, वालूर डॉ.मनीषा गोरे आणि डॉ.केशव डाखोरे, सोनपेठ डॉ.शहाजी कुरे, डॉ.रोहन सरोदे, डॉ.रमेश ढाकरे, राणीसावरगाव डॉ.अशितोष चाटे, कोद्री डॉ.कुणाल शिसोदिया, आसेगाव डॉ.अन्सारी मुद्दसर मजहर, आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ.सय्यद शाबाद अहमद आणि वझर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ.आमेर साजेद सय्यद चाँद यांची नियुक्ती झाली आहे.