१ कोटीच्या थकीत कराच्या वसुलीसाठी पूर्णा पालिकेत पाच पथकाची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 07:42 PM2019-01-23T19:42:36+5:302019-01-23T19:44:53+5:30
नोंदणीनुसार ८१८९ मालमत्ता धारक तर १४०० नळधारक आहेत.
पूर्णा (परभणी ) : मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता व नळपट्टी पोटी नागरिकांकडे १ कोटी १८ लाख १० हजार रुपये थकीत आहेत. याच्या वसुलीसाठी पालिकेने पाच पथकाची नेमणूक केली आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार; शहरात मार्च-२०१८ च्या नोंदणीनुसार ८१८९ मालमत्ता धारक तर १४०० नळधारक आहेत. यांच्याकडे पालिकेची १ कोटी १८ लाख १० हजाराचा कर थकीत आहे. याच्या वसुलीसाठी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर व नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांनी पाच पथकाची स्थापना केली आहे. नागरिकांनी कराचा भरणा करण्याचे आवाहन कार्यालयीन अधीक्षक शेख इम्रान, कर निरीक्षक आर बी चव्हाण यांनी केले आहे.
पालिकेला सहकार्य करा
नागरिकांना अधिक सुविधा देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी नागरिकांनी थकीत कराचा भरणा करून पालिकेला सहकार्य करावे.
- गंगाबाई एकलारे, नगराध्यक्षा