जिल्ह्यात ऑक्सिजन सिस्टर्सची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:18 AM2021-04-27T04:18:13+5:302021-04-27T04:18:13+5:30
परभणी : कोरोनाबाधित रुग्णांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिस्टर्सची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे ...
परभणी : कोरोनाबाधित रुग्णांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिस्टर्सची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिले आहेत. रुग्णालयात नियुक्त केलेल्या ऑक्सिजन सिस्टर्सने प्रत्येक चार तासांनी ऑफ रुग्णांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन तपासून त्या प्रमाणात ऑक्सिजनचा फ्लो कमी-जास्त करावा. पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन फ्लो केल्यानंतरही ९३ टक्के सॅच्युरेशन येत नसल्यास रुग्णाला वरच्या आरोग्य संस्थेत संदर्भित करावे. ऑक्सिजन सॅच्युरेशनचे महत्त्व लक्षात घेऊन ५० रुग्णांमागे एका ऑक्सिजन सिस्टरची नियुक्ती करावी, असे आदेश टाकसाळे यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे ऑक्सिजनवरील काही रुग्ण ऑक्सिजन मास्क काढून बाजूला ठेवतात. त्यामुळे विनाकारण ऑक्सिजन वाया जात आहे. या बाबीकडेही कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचना टाकसाळे यांनी दिल्या आहेत.