अपॉइंटमेट वाढल्या; वाहन हस्तांतरण प्रक्रियाही गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:30 AM2020-12-03T04:30:00+5:302020-12-03T04:30:00+5:30
वाहन फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या कामातही गती आणल्याचे ते म्हणाले. यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत कर्मचारी कार्यालयात हजर ...
वाहन फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या कामातही गती आणल्याचे ते म्हणाले. यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत कर्मचारी कार्यालयात हजर राहत असल्याचे नखाते यांनी सांगितले. परभणीच्या कार्यालयास आयएसओ प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणात असल्याचे नखाते म्हणाले.
जवळपास २ हजार वाहन परवाने आले परत
या कार्यालयांतर्गत पूर्वी वाहन परवाना संबंधितांना मिळण्यासाठी एक ते दीड महिना लागत होता. प्रत्यक्षात तो ७ दिवसांत मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली आहे. त्यात परिवहन विभाग व पोस्ट कार्यालयांतर्गत झालेल्या करारानुसार १ वाहन परवाना पोस्टाद्वारे संबंधितास पोहोचविण्यासाठी ५० रुपये परिवहन विभागाकडून पोस्ट कार्यालयास देण्यात येतात. हा वाहन परवाना संबंधितास देण्यासाठी परवानाधारक उपलब्ध झाला नाही तर ३ वेळा यासाठी पोस्टमनद्वारे प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास प्रतिपरवाना १७ रुपये पोस्ट कार्यालयाकडून परत घेतले जातील, असा इशाराही देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. आरटीओ कार्यालयात सध्या संबंधित परवानाधारक भेटला नाही, म्हणून पोस्ट कार्यालयाने जवळपास २ हजार परवाने परत आणून दिले आहेत. या परवानाधारकांशी संपर्क साधून एका सामूहिक कार्याक्रमात लवकरच हे परवाने वितरित करण्यात येणार असल्याचे नखाते यांनी सांगितले.