स्त्री मुक्ती दिन कार्यक्रमात १० ठरावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:19+5:302020-12-30T04:22:19+5:30

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर रोजी मनुस्मृतीचे दहन करून संपूर्ण स्त्री जातीला जोखडातून मुक्त केले. त्यानुषंगाने ...

Approval of 10 resolutions in Women's Liberation Day program | स्त्री मुक्ती दिन कार्यक्रमात १० ठरावांना मंजुरी

स्त्री मुक्ती दिन कार्यक्रमात १० ठरावांना मंजुरी

Next

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर रोजी मनुस्मृतीचे दहन करून संपूर्ण स्त्री जातीला जोखडातून मुक्त केले. त्यानुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजीवनी बारहाते, ॲड. हर्षा सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. कार्याक्रमच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य सचिव डाॅ. विजया चव्हाण यांची उपस्थिती होती. विभागीय प्रवक्ता डॉ. धर्मराज चव्हाण, डॉ. सुरेश शेळके, संपत नंद, सुभाष सोनवणे, अरुण गिरी, बी. आर आव्हाड, अशोक चांद्रमोरे, ए.एस. कांबळे अशोक वाव्हळ, अशोक कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ. विजया चव्हाण म्हणाल्या, महिलांनी त्यांच्या अधिकार आणि हक्कांबाबत जागृत झाले पाहिजे. पुरुष-स्त्री हा भेदभाव सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने देशाला मागे टाकतो. आज स्त्री ही पुरुषांच्या बरोबर ठामपणे उभी आहे, असे त्या म्हणाल्या. ॲड. हर्षा सूर्यवंशी यांनी उपस्थित महिलांना महिला कायद्याविषयी माहिती दिली. डॉ. संजीवनी बारहाते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांची स्त्री विषयक भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. संयोजक सुनीता साळवे, ॲड. प्रतिमा चंद्रमोरे, कुसुम कानकुटे यांनी पाहुण्याचे स्वागत केले. यशस्वीतेसाठी माला साळवे, विमल उगले, मंगला गायकवाड, गंगासागर पाटील, सविता सोनटक्के, अर्चना शितळे, निकिता इंगळे, साक्षी कांबळे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Approval of 10 resolutions in Women's Liberation Day program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.