स्वाराती विद्यापीठाच्या उपकेंद्रात नव्या ६ अभ्यासक्रमांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:22 AM2021-09-05T04:22:31+5:302021-09-05T04:22:31+5:30
परभणी येथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात एमएसडब्लू आणि इतर व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी मागणी आमदार ...
परभणी येथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात एमएसडब्लू आणि इतर व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी लावून धरली होती. त्यानुसार त्यांच्या या मागीला यश आले असून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सामाजिकशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातून सुरू करण्यास विद्यापीठाने मंजुरी दिली आहे़ तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत स्पॅनिश, फ्रेंच, डिप्लोमा इन जीएसटी, डिप्लोमा इन सायबर, शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्स इन जीएसटी हे अभ्यासक्रमही यावर्षीपासून सुरू करण्यात आले आहेत. एमएसडब्लूसाठी प्रतिवर्षी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. तसेच स्पॅनिश, फ्रेंच भाषा शिकण्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ३० विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश घेऊ शकतात़ डिप्लोमा इन जीएसटी ॲण्ड सायबर यासाठी कोणताही पदवीधारक प्रवेश घेऊ शकतो़ दोन्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी ३० जागा प्रतिवर्षी निश्चित करण्यात आल्या असून, अभ्यासक्रम कालावधी १ वर्षाचा असणार आहे़ तर सर्टिफिकेट कोर्स इन जीएसटी हा केवळ ५ आठवड्यांचा अभ्यासक्रम असून प्रतिवर्षी वाणिज्य शाखा पदवीधारक ४० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणारे एसआरटीचे परभणी उपकेंद्र महाराष्ट्रात एकमेव उपकेंद्र असणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. पाटील यांनी दिली.