शहरात समांतर पाणीपुरवठा योजना राबविण्यास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:22 AM2021-09-04T04:22:15+5:302021-09-04T04:22:15+5:30
जुना पेडगाव रस्त्याच्या कामावर चर्चा सभागृहामध्ये बाळासाहेब बुलबुले यांनी जुना पेडगाव रोड येथे नवीन रोडचे काम संथगतीने सुरू असल्याचे ...
जुना पेडगाव रस्त्याच्या कामावर चर्चा
सभागृहामध्ये बाळासाहेब बुलबुले यांनी जुना पेडगाव रोड येथे नवीन रोडचे काम संथगतीने सुरू असल्याचे सांगितले. यावर आयुक्त पवार यांनी हे काम युद्धपातळीवर करण्यात येईल, असे सांगितले. तसेच सचिन अंबिलवादे, इम्राण हुसैनी, नाजमीन पठाण यांनी हे काम तत्काळ सुरू करावे व अन्य प्रभागात सुद्धा विकासकामे तत्काळ करावीत, असे सभागृहाला सुचविले.
वैद्यकीय महाविद्यालय देण्याच्या ठारवास मान्यता
जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याच्या मागणीचा ठराव विषय पत्रिकेमध्ये ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. हा विषय सभागृहामध्ये महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे यांनी मांडला. यास सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असून, वैद्यकीय, तांत्रिक शिक्षणापासून सामान्य कुटुंबातील विद्यार्थी हा वंचित राहिला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे अत्यंत आवश्यक असल्याचे उपमहापौर भगवान वाघमारे यांनी सांगितले. त्यास सभागृहात एकमताने मंजुरी दिली.