रस्त्यासाठी खोदकाम करताना फुटली जलवाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:22 AM2021-08-13T04:22:08+5:302021-08-13T04:22:08+5:30
गंगाखेड रोड भागात सध्या परभणी ते गंगाखेड या मुख्य रस्त्याचे काम केले जात आहे. हे काम करीत असताना गुरुवारी ...
गंगाखेड रोड भागात सध्या परभणी ते गंगाखेड या मुख्य रस्त्याचे काम केले जात आहे. हे काम करीत असताना गुरुवारी दुपारी साधारणतः साडेबारा वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू होते. याच वेळी या भागातून गेलेली जलवाहिनी फुटली. फुटलेल्या भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला आहे. सुमारे एक ते दीड तास या ठिकाणाहून पाणी वाहत असल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. शहरी भागात रस्त्याचे काम करीत असताना मनमानीपणा चालविला जात आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीत हे काम सुरू आहे. तेव्हा मनपाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित असणे अपेक्षित होते; परंतु एकही अधिकारी खोदकाम करताना उपस्थित नव्हता. त्यामुळे जलवाहिनी फुटण्यासारखे प्रकार होत आहेत. गुरुवारी जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. यास मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे यांनी केला आहे.