पालमचा पोलीस वसाहतीचा परिसर पडला ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:14 AM2020-12-25T04:14:26+5:302020-12-25T04:14:26+5:30

पालम : शहरात पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी वर्गाला वास्तव्यासाठी असलेला परिसर चक्क ओसाड पडला आहे. इमारत जुनाट ...

The area of Palam's police colony was deserted | पालमचा पोलीस वसाहतीचा परिसर पडला ओसाड

पालमचा पोलीस वसाहतीचा परिसर पडला ओसाड

Next

पालम : शहरात पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी वर्गाला वास्तव्यासाठी असलेला परिसर चक्क ओसाड पडला आहे. इमारत जुनाट झाल्याने मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून दुरवस्था झाली आहे.

पालम शहरात ताडकळस रस्त्यावर ग्रामीण रूग्णालय इमारतीच्या पाठीमागे पोलीस कर्मचारी वसाहत असून, २० ते २५ जुनाट खोल्यांची इमारती आहेत. पूर्ण पत्रे तुटून गेल्याने खोल्या उघड्या झाल्या आहेत. तर भिंतीला तडे गेल्याने जागोजागी खचल्याने आहेत. कोणीही कर्मचारी वास्तव्यास नसल्याने दारे व खिडक्या मोडून पडल्या आहेत. मागील १५ वर्षापासून हा परिसर अस्वच्छ बनला आहे. ५ एकर जागा असून, ही इमारत दुरवस्था झाल्याने वास्तव्यास राहण्यासाठी लायक जागा राहिलेली नाही. त्यामुळे पोलिसांना किरायाच्या घरात रहावे लागत आहे. या ठिकाणी मुबलक प्रमाणात जमीन असल्याने नवीन इमारत बांधकाम होणे गरजेचे आहे.

थोमपट्टा

विश्रामगृहाला घाणीचा विळखा

पालम : शहरात जायकवाडी वसाहत परिसरात असलेल्या विश्रामगृहाची दुर्दशा झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रीयमार्ग यंत्रणेचे कार्यालय आहे. परंतु, पूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त पाणी व घाणीचे वेढलेला आहे. त्यामुळे या भागात कर्मचारी व नागरिक यांना जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

पालम : शहरात सार्वजनिक रस्ता व ठिकाणी परिसरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरभर कोठेही रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे लावली जात आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी होऊन गैरसोय वाढली आहे.

राज्य मार्गावर मातीचे ढिगारे

पालम : पालम ते ताडकळस या रस्त्यावर काही ठिकाणी पुलाचे कामे सुरू आहेत. या ठिकाणी मातीचे ढिगारे साचले आहेत. पुलावरून वाहने जाताच धुळीचा लोट उडत आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना त्रास वाढला आहे. काम करणारा गुत्तेदाराचे लक्ष राहिलेले नाही.

दस्त नोंदणीला गर्दी

पालम : शहरात जमीन व इतर मालमत्ता खरेदी विक्री दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. सध्या शासनाचा ग्रामीण भागात केवळ ३ टक्के शुल्क आकारला जात असल्याने नेहमीपेक्षा अर्धा रकमेत दस्त नोंदणी केली जात आहे. त्यामुळे गर्दी वाढली आहे.

सेल्फी पॉईंटचा धोका

पालम : पालम ते ताडकळस रस्त्यावर धानोरा काळे पुलावर डिग्रस बंधाऱ्याचे बॅकवाॅटर असल्याने गोदावरी नदीचे पात्र तुडुंब भरले आहे. दोन्ही बाजूंना पाणी दिसत आहे. त्यामुळे अनेकजण वाहने उभी करून पाण्यात सोबत सेल्फी काढत आहे. सेल्फी घेताना जीव धोक्यात घालून सेल्फी काढली जात आहे.

Web Title: The area of Palam's police colony was deserted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.