परभणीत पार पडली कलावंत जागृती परिषद :लोककलावंत सोयी-सुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:54 PM2019-08-12T23:54:39+5:302019-08-12T23:56:25+5:30
सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवणाऱ्या लोककलावंतांना शासन, प्रशासन मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप यशवंत मकरंद यांनी केला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवणाऱ्या लोककलावंतांना शासन, प्रशासन मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप यशवंत मकरंद यांनी केला़
येथील महात्मा फुले कॉलनीतील सभागृहात लोककलावंत सांस्कृतिक मंच आणि युगंधर फाऊंडेशनच्या वतीने लोककलावंत जागृती परिषदेत मकरंद बोलत होते़ ते म्हणाले, महापुरुषांचा विचार, वारसा जोपासणारे, प्रबोधन आणि न्याय हक्कांचा आवाज बुलंद करणारे लोककलावंत हे खºया अर्थाने विचार वाहक आहेत़ यावेळी शाहीर नामदेव लहाडे, मदन कदम, भारत मुंजे, रमेश काटे, अजमत खान, शिवाजी सुगंधे, शिवाजी धबाले, प्रा़ अरुण पडघन, उत्तमराव गायकवाड आदींची भाषणे झाली़ युगांधर फाऊंडेशनचे संजीव अढागळे यांनी प्रास्ताविक केले़ लक्ष्मण डंबाळे यांनी आभार मानले़ या परिषदेत गायक, कवी, गोंधळी, नाट्यकलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते़ या परिषदेत कलावंतांच्या न्याय हक्कांचे २२ ठराव घेण्यात आले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी कांता मनेरे, विठ्ठल नंद, डी़एस़ खरात, अशोक लोंढे, भास्कर कांबळे, सीताराम वाटोरे, भारत देवरे, भीमराव धुतमल, देविदासराव वाघमारे, अंकुश वागेरे, उत्तमराव गायकवाड, यशोदाबाई इंगोले, भारती राऊत, ललिता सिरसाठ आदींनी प्रयत्न केले़
कलावंतांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा इशारा
४परभणी- लोककलावंतांचे प्रश्न १५ सप्टेंबरपर्यंत न सुटल्यास राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा लोककलावंत क्रांती परिषदेच्या बैठकीत देण्यात आला़
४११ आॅगस्ट रोजी येथील महात्मा फुले कॉलनीत शाहीर रमेश गिरी, सोमनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली़ बैठकीस अशोक शिंदे, गौतम इंगोले, विश्वास रणवीर, विशाल गायकवाड, शफिक पटेल, राजरत्न सोनुले, भास्कर कांबळे, सुनीता कांबळे, वंदना खरात, डॉ़ अगस्ती इंगोले, माया नरवाडे आदींची उपस्थिती होती़
४कलावंतांचे धूळ खात पडलेले अर्ज मंजूर करावेत, ५ हजार रुपये मासिक वेतन द्यावे, विना अट मानधन वितरित करावे, कलावंतांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या़ १५ सप्टेंबर रोजी याच मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला़ बैठकीस शाहीर काशीनाथ उबाळे, भास्कर गोडबोले, लक्ष्मण ससाने, सुरेखा साळवे, सुनीता कांबळे, अंकुश वाटुरे आदींची उपस्थिती होती़