महिनाभरापासून आसेगावकरांना मिळेना पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:48+5:302021-07-12T04:12:48+5:30
जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील लोकसंख्या जवळपास ४ हजारांच्या घरात आहे. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन-तीन किमीवरून पाइपलाइनद्वारे पाणी ...
जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील लोकसंख्या जवळपास ४ हजारांच्या घरात आहे. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन-तीन किमीवरून पाइपलाइनद्वारे पाणी आणले आहे. मात्र मागील महिनाभरापूर्वी या पाइपलाइनला गळती लागल्याने गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. याबाबत प्रतिनिधीने ग्रामसेवक आमले यांना जलवाहिनी कधी दुरुस्त होणार याबाबत विचारले असता, ग्रामसेवकाने माझ्याकडून हे होणार नाही, तुम्हाला जे काय करायचे आहे ते करा, असे उलट उत्तर दिले. त्यामुळे महिनाभरापासून पाण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या ग्रामसेवकावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, याबाबत ग्रामसेवक आमले यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रा. पं. कडे निधी उपलब्ध नसल्याने दुरुस्तीसाठी वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले.