जिल्ह्यात आशा वर्कस्च्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:22+5:302021-04-10T04:17:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : शहरी आणि ग्रामीण आशा वर्कस यांना २ हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना ३ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरी आणि ग्रामीण आशा वर्कस यांना २ हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना ३ हजार रुपये मानधन द्यावे, अशी आयटक संघटनेची मागील अनेक दिवसांची आहे. मात्र अद्याप शासनाने या मागणीची दखल घेतली नसल्याने आशा वर्कसमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
आशा वर्कसच्या विविध मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागणीसाठी आयटक आरोग्य विभाग आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. त्या त्यावेळी शासनाकडून केवळ आश्वासनेच देण्यात आली. मात्र अद्याप या आश्वासनांची पूर्तता झाली नाही.
त्यामुळे वेतनाच्या प्रश्नावर आता आयटक प्रणित कृती समितीने काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्ह्यातील आशांचे पाच महिन्यांचे थकीत मानधन एरिएससह खात्यात जमा करावे, आशा वर्कस यांना १८ हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना २१ हजार रुपये फिक्स पगार देऊन त्यांना सेवेत कायम करावे, जंतुनाशक गोळी वाटप व किशोरवयीन मुलींना गोळी वाटप केलेल्या कामाचा मोबदला द्यावा, राज्यातील शहरी व ग्रामीण आशा व गटप्रवर्तकांनी एएनएम व जीएनएम कोर्स केला असल्यास या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागामध्ये एएनएम व जीएनएम रिक्त पदावर समाविष्ट करुन घ्यावे, दोन वर्षांपूर्वी नियुक्ती मिळालेल्या आशा व गटप्रवर्तकांची ९ महिन्यांचे मानधन रखडले आहे. ते अदा करावे, समान काम समान वेतन या नियमाची अंमलबजावणी करावी, आदी मागण्या आयटक संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करुन ही शासन लक्ष देत नसल्याने आशा स्वयंसेविकात संताप व्यक्त होत आहे.
या मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. मुगाजी बुरुड, कॉ. राजू देसले, श्याम काळे, सुमन पुजारी, बाबाराव आवरगंड, ज्योती स्वामी, विश्वनाथ गवारे, संगीता काळबांडे, वंदना हिवराळे, सुनीता कुरवाडे, सुधाकर वाढवे, वैशाली गरड, पांडुरंग कस्तुरे, संजीवनी फुलमाळी, योगिनी चव्हाण, प्रणाली चिद्रवार आदींनी दिला आहे.