लसीच्या सुरक्षिततेबाबत मूल निवासी संघाने मागितली हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:25+5:302021-04-10T04:17:25+5:30
देशभरात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी लसीकरण केले नाही, अशांचे पगार कपात ...
देशभरात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी लसीकरण केले नाही, अशांचे पगार कपात करण्याचेही आदेश दिले आहेत. लस घेतल्यानंतर काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तेव्हा कर्मचारी- कामगारांना दिलेली लस पूर्णत: सुरक्षित असल्याबाबत प्रशासनाने सक्ती करू नये. तसेच सक्ती केल्यास कामगार- कर्मचाऱ्यांना लसीच्या सुरक्षिततेबाबत हमी द्यावी. त्यात जे कामगार- कर्मचारी दीर्घ आजाराने ग्रस्त आहेत, त्यांनी कोविड लस घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर कोणताही परिणाम होणार नाही, ही लस घेतल्यानंतर १०० टक्के कोरोना आजार होत नाही, जर एखादा कामगार, कर्मचारी कोविड लस घेतल्यानंतर दगावला तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला तो ज्या विभागात, ज्या पदावर, ज्या वेतनावर कार्यरत आहे, त्या पदावर नोकरी देण्याची हमी द्यावी, त्याचप्रमाणे जर एखादा कर्मचारी लस घेतल्यानंतर दगावला तर त्याच्या कुटुंबातील परिजनांना उदरनिर्वाह करण्यासाठी किमान १ कोटी रुपये व कमाल ५ कोटी रुपये दिले जातील, ही लस घेतल्यानंतर कोरोना आजार होत नाही, असे वैज्ञानिकांकडून झालेल्या तपासणीची हमी द्यावी, आदी मागण्या राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राजेंद्र इंगोले, किशोर शिंदे, राजेंद्र राजदीप, रविकुमार नरवाडे, प्रमोद लाटे, रूपेश बरडे, ॲड. विनोद अंभोरे आदींनी केल्या आहेत.