सोशल मीडियावर वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:25+5:302020-12-24T04:16:25+5:30

आठवडी बाजार पूर्वीच्या जागेत भरवण्याची मागणी सोनपेठः शहरातील आठवडी बाजार कोरोनामुळे बायपास रोडवर भरत आहे. परंतु, लाकडाऊननंतर सर्व व्यवहार ...

The atmosphere heated up on social media | सोशल मीडियावर वातावरण तापले

सोशल मीडियावर वातावरण तापले

Next

आठवडी बाजार पूर्वीच्या जागेत भरवण्याची मागणी

सोनपेठः शहरातील आठवडी बाजार कोरोनामुळे बायपास रोडवर भरत आहे. परंतु, लाकडाऊननंतर सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे शहरातील आठवडी बाजारही पूर्वीच्या जागेत भरवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

हरभरा पिकावर शेंडेअळीचा प्रादुर्भाव.

वस्सा - जिंतूर तालुक्यातील वस्सा परिसरात हरभरा पिकावर शेंडेअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. ज्यामुळे लदबदून आलेले हरभरा पीक अडचणीत सापडले आहे. खरीप हातचे गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. परंतु शेंडेअळीमुळे हरभरा पीक धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील बळीराजा त्रस्त झाला आहे.

बस सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

वस्सा - जिंतूर आगाराने ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही सुरू न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिसरातील वस्सा, आसेगाव व दुधगाव येथील बहुसंख्य विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावी व बारावीच्या शिक्षणाकरिता जिंतूरला प्रवेश आहेत. परंतु, जिंतूर आगाराची बस अद्याप सुरू नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. अनलॉकनंतर शाळा, महाविद्यालय सुरू झाले. परंतु, जिंतूर आगाराने ग्रामीण भागातील बस सुरू न केल्याने विद्यार्थ्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. ज्याकडे जिंतूरच्या आगारप्रमुखांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

अभियान प्रमुखपदी मंगेश कुरे यांची निवड

जिंतूर - येथील श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण प्रमुखपदी मंगेश कुरे यांची निवड करण्यात आली. यावेळी अभिजित आष्टूरकर रा. स्व. संघ सहकार्यवाह परभणी जिल्हा सुरेंद्रजी शहाणे, वि. हिं. प. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद कानडे, वि. हिं. प. कार्यकारी अध्यक्ष सुरेश ठोंबरे, ह.भ.प. संदीप महाराज शर्मा आदीची उपस्थिती होती

Web Title: The atmosphere heated up on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.