युवतीवर अत्याचार; जवानाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:16 AM2021-03-19T04:16:55+5:302021-03-19T04:16:55+5:30
परभणी : लग्नाचे आमीष दाखवून सतत अत्याचार केल्यानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या सैन्य दलातील जवानाविरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात ...
परभणी : लग्नाचे आमीष दाखवून सतत अत्याचार केल्यानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या सैन्य दलातील जवानाविरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पीडित युवतीने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिवाळीच्या सुट्टीसाठी पीडित युवती गंगाखेड तालुक्यातील चिलगरवाडी येेथे आजोळी गेली होती. २०१६मध्ये ती चिलगरवाडी येथे गेली असता, याच गावातील लक्ष्मण धायगुडे याच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांचेही फोनवर सतत बोलणे होत होते. याच दरम्यान २०१७मध्ये लक्ष्मण धायगुडे हा सैन्य दलात भरती झाला. २०१९मध्ये एक महिन्याची सुट्टी घेऊन लक्ष्मण हा गावाकडे आला होता. यावेळी त्याने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, लग्नाचा विषय काढल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देत असे. अनेकदा लग्नाविषयी विचारणा केल्यानंतरही त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आई-वडिलांनीही या लग्नाला विरोध केल्यामुळे पीडित युवतीने ग्रामीण पोलीस ठाण्यात लक्ष्मण याच्याविरोधात तक्रार दिली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण धायगुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय गीते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.