एटीएसच्या कारवाईत पारवा शिवारातून जिलेटिनच्या सहाशे कांड्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 01:51 PM2021-10-07T13:51:05+5:302021-10-07T13:53:15+5:30

ATS Raid in Parabhani : पोलिसांनी या कारवाईमध्ये ६०० प्लास्टिक कोटेड जिलेटीन कांड्या असलेले तीन बॉक्स जप्त केले आहेत.

ATS seizes 600 gelatin sticks from Parawa Shivara of Parabhani District | एटीएसच्या कारवाईत पारवा शिवारातून जिलेटिनच्या सहाशे कांड्या जप्त

एटीएसच्या कारवाईत पारवा शिवारातून जिलेटिनच्या सहाशे कांड्या जप्त

Next

परभणी : तालुक्यातील पारवा शिवारातील एका गोदामातून दहशतवाद विरोधी पथकाने ( ATS Raid  in Parabhani ) जिलेटिन सहाशे कांड्या जप्त केल्या आहेत. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. 

दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी भारत नलावडे तसेच पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, अकबर पठाण, अझहर पटेल, दीपक मुदिराज, सुधीर काळे हे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गस्त घालत असताना पारवा शिवारातील एका गोदामात अनधिकृतरीत्या जिलेटिनच्या काड्या साठविल्याची माहिती त्यांना मिळाली. ही माहिती ग्रामीण पोलिस ठाण्यास दिल्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश राहिरेकर्मचारी प्रभाकर राठोड, वाय.एम. खान, लिंबाळकर आदी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन पारवा शिवारात दाखल झाले. 

येथे मोहम्मद शहाजी उर्फ शाकेर पिता मोहम्मद खदीर अहमद खान यांच्या शेतातील गोदामाची गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. तेव्हा गोदामातील एका कोपऱ्यामध्ये भिंतीलगत बॉक्समध्ये जिलेटीन कांड्या आणि ब्लास्टिंग करण्याचे वायर मिळाले. हा सर्व ऐवज व असुरक्षितपणे आणि लोकांना जीवितहानी होईल अशा पद्धतीने विनापरवाना लपवून ठेवल्याचे आढळले. 

पोलिसांनी या कारवाईमध्ये ६०० प्लास्टिक कोटेड जिलेटीन कांड्या असलेले तीन बॉक्स जप्त केले आहेत. तसेच स्फोट करण्यासाठी वापरण्यात येणारे वायरचे तुकडेही यावेळी जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी भारत नलावडे यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद शहाजी उर्फ शाकेर पिता मोहम्मद खलील अहमद खान याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: ATS seizes 600 gelatin sticks from Parawa Shivara of Parabhani District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.