वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांवर उसाच्या फडात हल्ला;मुकादमासह नऊ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 12:48 PM2022-02-14T12:48:09+5:302022-02-14T12:49:20+5:30

ऊसतोड मुकादम राजेभाऊ चव्हाण याच्यावर चेक बाउंस प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

attack on Police in pathari while issuing warrant | वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांवर उसाच्या फडात हल्ला;मुकादमासह नऊ जणांवर गुन्हा

वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांवर उसाच्या फडात हल्ला;मुकादमासह नऊ जणांवर गुन्हा

googlenewsNext

पाथरी ( परभणी ) - चेक बाउंस प्रकरणात वॉरंट बजावण्यास गेलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना पाथरी तालुक्यातील हदगाव बु शिवारात रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

ऊसतोड मुकादम राजेभाऊ चव्हाण याच्यावर चेक बाउंस प्रकरणात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील आटपाटी  पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी आणि पाथरी पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी  न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास हदगाव बु येथील शिवारात ऊसतोड मुकादम राजेभाऊ चव्हाण याच्यावर वॉरंट बजावण्यास गेले होते. 

यावेळी मुकादम चव्हाण आणि इतर चार जणांनी तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना काठ्यांने बेदम मारहाण करत जखमी केले. तसेच पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करून शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सायद जाफर सायद माहेमुद यांच्या तक्रारीवरून 9 जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: attack on Police in pathari while issuing warrant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.