परभणी : शेतकºयांच्या प्रश्नांवर हल्लाबोल यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:23 AM2018-01-08T00:23:41+5:302018-01-08T00:24:25+5:30
तुळजापूरहून निघणाºया हल्लाबोल यात्रेत स्थानिक प्रश्नांसह शेतकºयांच्या प्रश्नांवर आवाज उठविणार असून, १६ ते २४ जानेवारी दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात ही यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तुळजापूरहून निघणाºया हल्लाबोल यात्रेत स्थानिक प्रश्नांसह शेतकºयांच्या प्रश्नांवर आवाज उठविणार असून, १६ ते २४ जानेवारी दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात ही यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली़
हल्लाबोल यात्रेच्या पूर्व तयारी करण्याच्या अनुषंगाने रविवारी आ.धनंजय मुंडे यांनी राष्टÑवादी काँग्रेस पदाधिकाºयांची बैठक घेतली. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आ.मुंडे म्हणाले, मराठवाड्यातील शेतकºयांची कर्जमाफी, हमीभाव, बोंडअळी आदी समस्यांनी शेतकरी ग्रासला आहे़ परंतु, याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे़ त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १६ जानेवारीपासून मराठवाड्यातील तुळजापूर येथून हल्लाबोल यात्रेला सुरुवात होणार आहे़ ही यात्रा मराठवाड्यातील आठ जिल्हे व २७ तालुक्यांतून निघणार आहे़
या यात्रेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते सहभागी होणार आहेत़ स्थानिक प्रश्नांसह मराठवाड्यातील गंभीर प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे़, असे मुंडे यांनी सांगितले. ३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून यात्रेचा समारोप होणार आहे़, अशी माहिती त्यांनी दिली.
या पत्र परिषदेस माजीमंत्री प्रकाश सोळंके, आ़विक्रम काळे, आ़बाबाजानी दुर्राणी, आ़रामराव वडकुते, आ़ डॉ.मधुसूदन केंद्रे, आ़विजय भांबळे, सोनाली देशमुख, प्रताप देशमुख, अॅड़बाळासाहेब जामकर, मारोती बनसोडे, सुरेश भुमरे आदींची उपस्थिती होती़
२२ व २३ जानेवारी रोजी परभणीत आगमन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांसह मराठवाड्यातील गंभीर प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार आहे़
२२ जानेवारी रोजी परभणी येथे या यात्रेचे आगमन होणार असून, सायंकाळी ७ वाजता जाहीर सभा होणार आहे. तसेच २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पाथरी व दुपारी ३ वाजता सेलू येथे यात्रेचे आगमन व जाहीर सभा होईल. या यात्रेची जिल्ह्यात जोरदार पूर्व तयारी केली जाणार आहे. या अनुषंगाने राष्टÑवादी काँग्रेसच्या तालुकानिहाय बैठकाही होणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.