परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरक्षणासाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ज्ञानेश्वर भाले | Published: October 27, 2023 03:30 PM2023-10-27T15:30:29+5:302023-10-27T15:31:30+5:30

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे, पुढील अनर्थ टळला.

Attempt of self-immolation of youth for reservation in Parbhani Collectorate area | परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरक्षणासाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरक्षणासाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

परभणी : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी राज्यभरात समाज बांधवांकडून आंदोलन, मोर्चा, पुढाऱ्यांना गाव बंदी आदी भुमिका घेतल्यात जात आहे. त्याच पार्श्वभुमिवर परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका युवकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जोर लावल्या जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर आरक्षणाचे लाेण राज्यभरात पसरले. २४ ऑक्टोबरपर्यंत समाजाला न्यास देऊ असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले होते. परंतु, आरक्षणाबाबत सकारात्क निर्णय अद्यापही झाला नसल्याने त्यांचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याची स्थिती आहे.

त्यातच शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आतिश गरड या युवकाचे मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, या मागणीसाठी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे, पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल असून, त्याला मोंढा पोलीस ठाण्यात त्यास नेण्यात आले. 

Web Title: Attempt of self-immolation of youth for reservation in Parbhani Collectorate area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.