परभणी जिल्ह्यातील ११ उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार जाहीर

By मारोती जुंबडे | Published: September 13, 2023 06:28 PM2023-09-13T18:28:13+5:302023-09-13T18:29:01+5:30

यावर्षी जिल्हा पुरस्कारासाठी पारदर्शकता यावी, यासाठी शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी राज्य पुरस्काराच्या धर्तीवर निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

Award announced to 11 outstanding teachers of Parbhani district | परभणी जिल्ह्यातील ११ उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार जाहीर

परभणी जिल्ह्यातील ११ उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार जाहीर

googlenewsNext

परभणी : जिल्हा परिषदेने विभागीय आयुक्त कार्यालयास जिल्हा पुरस्काराच्या निवडीचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून जिल्ह्यातील ११ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुन यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा निवडीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला ८ सप्टेंबर रोजी मान्यता मिळाली. संभाजीनगरचे विभागीय उपा आयुक्त सुरेश बेदमुथा यांचे पत्र परभणी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. निवड समितीने सादर केलेल्या ९ प्राथमिक व २ माध्यमिक शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

हे आहेत उत्कृष्ट शिक्षक ...
मोहम्मद जावेद खान अब्दुल रहमान खान (गंगाखेड), महादेव रामचंद्र खुडे (जिंतूर), माणिक प्रल्हादबुवा पुरी (मानवत), सतीश मंचकराव जाधव (पालम), सुप्रिया विजयराव श्रीमाळी (परभणी), ज्ञानेश्वर उत्तमराव निपाणीकर (पाथरी), मारुती जगजीराव डोईफोडे (पूर्णा), शरद संदिपान ठाकर (सेलू), संतोष रामराव चाफळे (सोनपेठ) यांची प्राथमिक शिक्षक उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड झाली. तर माध्यमिक शिक्षकांमध्ये सुमित मधुकरराव लांडे (पाथरी), प्रशांत खंडू सोनवणे (पूर्णा) यांची निवड झाली आहे.

निवड राज्य पुरस्काराच्या धर्तीवर
यावर्षी जिल्हा पुरस्कारासाठी पारदर्शकता यावी, यासाठी शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी राज्य पुरस्काराच्या धर्तीवर निवड प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षणाधिकारी योजना संजय ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली या निवड समितीने उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून तो प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवला होता. ही निवड चाचणी ऑनलाईन आणि नंतर ऑफलाईन घेण्यात आली.

Web Title: Award announced to 11 outstanding teachers of Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.