जागरूक नागरिक आघाडीचा जिल्हाभरात विस्तार वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:24 AM2021-08-17T04:24:21+5:302021-08-17T04:24:21+5:30
जागरूक नागरिक आघाडीची रविवारी शहरातील स्टेडियम परिसरात बैठक घेण्यात आली. यावेळी ॲड. माधुरी क्षीरसागर यांनी आगामी काळात आघाडीच्या कार्याची ...
जागरूक नागरिक आघाडीची रविवारी शहरातील स्टेडियम परिसरात बैठक घेण्यात आली. यावेळी ॲड. माधुरी क्षीरसागर यांनी आगामी काळात आघाडीच्या कार्याची दिशा, चौकट तसेच संघटनात्मक ढांचा कसा असावा, याबद्दल मार्गदर्शन केले. प्रत्येक तालुका व गावस्तरापर्यंत तसेच नागरी भागात प्रभाग व वाॅर्डस्तरापर्यंत जागरूक नागरिक आघाडीचे समन्वयक व कोअर कमिट्या स्थापन करून जिल्हाभर आघाडीचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेचा रेटा व दबावगट निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून आघाडीच्या वतीने हेल्पलाईन व संपर्कासाठी कार्यालय सुरू करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. परभणी महानगरपालिकेच्या कक्षेत येणारे नागरी सुविधांचे प्रश्न हाती घेणार असल्याचे यावेळी सुभाष बाकळे यांनी सांगितले. यावेळी संतोष आसेगावकर यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीतील चर्चेत माणिक कदम, शिवलिंग बोधने, विजया कातकडे, राजन क्षीरसागर, सुप्रिया कुलकर्णी, हेमा रसाळ, संदीप सोळंके, संतोष देशमुख, ॲड लक्ष्मण काळे आदींनी सहभाग घेतला.