युगांधरच्या वतीने परभणीत एड्स जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:01 AM2017-12-02T01:01:26+5:302017-12-02T01:01:34+5:30
येथील युगांधरच्या वतीने १ डिसेंबर रोजी शहरातील ज्ञानेश्वर कॉर्नरपासून एड्समुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात समारोप झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील युगांधरच्या वतीने १ डिसेंबर रोजी शहरातील ज्ञानेश्वर कॉर्नरपासून एड्समुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात समारोप झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमेश्वर जवादे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून एल.व्ही.भालेराव, शाहीर नामदेव लहाडे, आर.पी.मंगरुळकर यांची उपस्थिती होती. या रॅलीला संबोधीत करताना समादेशक अधिकारी जवादे म्हणाले की, एड्स या महाभयंकर रोगाची दाहकता पहिल्या सारखी राहिली नसून या आजारावर काहीअंशी अंकुश ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
या आजाराबाबत समज, गैरसमज व एड्स रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवून त्यांचे आयुष्य वाढविण्यासाठी शासकीय पातळीवरील यंत्रणा व जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे, असे ते म्हणाले. युगांधर फाऊंडेशनचे अध्यक्ष संजीव अढागळे यांनी प्रास्ताविक केले.
अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन तर डी.एस.खरात यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी अनिल कुरवाडे, अनिल धाडवे, अशोक कांबळे, अरुण वाहुळे, अनिल भराडे, प्रमोद ढाले, राजू दिवाण, सौरभ इंगोले, तेजस शिवभगत, संघर्ष भिसे, सय्यद मुस्तफा, गुलचंद राजभोज, निवृत्ती राऊत आदींनी प्रयत्न केले.