मानवत, सेलू तालुक्यात पथनाट्याद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:10 AM2021-02-19T04:10:57+5:302021-02-19T04:10:57+5:30

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने जनजागृतीचे उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत बालगंधर्व सांस्कृतिक, ...

Awareness through street plays in Manavat, Selu taluka | मानवत, सेलू तालुक्यात पथनाट्याद्वारे जनजागृती

मानवत, सेलू तालुक्यात पथनाट्याद्वारे जनजागृती

Next

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने जनजागृतीचे उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळाने मानवत तालुक्यातील कोथळा, राजुरा, पारडी, शेवडी, नरळद, आटोळा, सोमठाणा आदी गावात लोककला, लोकनाट्य आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यात कोरोना लसीकरण, नदीप्रदूषण, स्वच्छता आदी विषयांचा समावेश होता.

पंढरीनाथ बोडखे, शाहीर सुभाष पांचाळ, बाबासाहेब खूपसेकर, सोपान महाराज भोसले, बाळासाहेब कानडे, बालाजी वाडेकर, श्रीकांत कुलकर्णी, सय्यद इम्रान, संजय पांडे, सोनाली खराबे, आबासाहेब तिडके, भास्कर डासाळकर, मारुतीबुवा वाघ, गणेश कोइते, रामकृष्ण बोडखे, बालाजी खराबे, अनंतराव खराबे, काशिनाथ खराबे, अनिल पांडे, अंजली कुलकर्णी, प्रसाद देशपांडे आदी कलावंतांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे राजीव गांधी युवा फोरम या संस्थेने सेलू तालुक्यातील नागठाणा, कुंभारी, तळतुंबा, पिंपरी, खादगाव, जवळा जीवाजी आदी गावांत जनजागृती केली आहे. या पथकात शाहीर सुभाष पांचाळ, संजय पांडे, बालनाथ देशपांडे, प्रमोद बल्लाळ, नागेश कुलकर्णी, प्रकाश बारबिंड, बाळासाहेब कानडे, पंढरीनाथ बोडखे, रेवती पांडे, ज्ञानेश्वर पांचाळ, संकेत पांडे, सत्यभामा पांचाळ, श्रीकांत कुलकर्णी, उदय कातनेश्वरकर, दिनकर जोशी आदी कलावंतांचा सहभाग होता.

Web Title: Awareness through street plays in Manavat, Selu taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.