लसीकरणस्थळी वरपुडकरांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:50+5:302021-04-28T04:18:50+5:30
जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण मोहीम सुरू आहे. दैठणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरही लसीकरण मोहीम राबिवण्यात येत आहे. या केंद्रावरील काही ...
जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण मोहीम सुरू आहे. दैठणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरही लसीकरण मोहीम राबिवण्यात येत आहे. या केंद्रावरील काही ग्रामस्थ लस घेण्याबाबत शंका उपस्थित करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रेरणाताई वरपुडकर यांनी या केंद्रास भेट दिली. तसेच यावेळी उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी कोरोनावर मात करायची असेल तर लस घेणे आवश्यक आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्व पात्र ग्रामस्थांनी ती घेतली पाहिजे, असे सांगितले. यावेळी उपस्थितांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले. यावेळी डॉ चव्हाण, डॉ. अडसले, सरपंच राजाराम कच्छवे, ग्रामविकास अधिकारी पंचगले, उपसरपंच अभय कच्छवे, ग्रा. पं. सदस्य सूरज कच्छवे, गजानन कच्छवे, रंगनाथ कच्छवे, आशा वर्कर आदींची उपस्थिती होती.