परत एकदा आखाडा ! ग्रामीण भागातील तरुणांत कुस्तीबाबत वाढत आहे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 06:49 PM2018-03-31T18:49:36+5:302018-03-31T18:49:36+5:30
चैत्र महिन्याच्या प्रारंभानंतर खेडोपाडी यात्रांचे आयोजन होते. यात होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धात आता तरुणाई पुढे येत आहे. तालुक्यातील अहेरवाडीतच्या यात्रा महोत्सवातील कुस्त्यांच्या दंगलीत हेच चित्र दिसून आले.
पूर्णा (परभणी) : चैत्र महिन्याच्या प्रारंभानंतर खेडोपाडी यात्रांचे आयोजन होते. यात होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धात आता तरुणाई पुढे येत आहे. तालुक्यातील अहेरवाडीतच्या यात्रा महोत्सवातील कुस्त्यांच्या दंगलीत हेच चित्र दिसून आले.
कुस्ती या क्रीडाप्रकाराला पौराणिक काळापासून महत्व आहे. मल्ल अथवा कुस्ती प्रकारचे अनेक उदाहरण पौराणिक कथा व पुराणात दिसून येतात पूर्वी ग्रामीण भागात कुस्तीच्या तालमी होत असे परंतु तंत्रज्ञान वाढल्याने अनेक नव्या सुविधा उपलब्ध झाल्या. यामुळे तरुणाई कुस्तीसह बहुतांश मैदानी खेळापासून दूर जात असून हे खेळ लोप पावत आहेत.
ग्रामीण भागात मात्र पुन्हा एकदा या मैदानी क्रीडा प्रकाराकडे तरुणाई आकर्षित होत असून पूर्णा तालुक्यातील अहेरवाडी येथे आयोजित कुस्ती स्पर्धात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील चारशे पहेलवानांनी उपस्थिती दर्शवली. यात ग्रामीण भागातील मल्लांची संख्या जास्त असली तरी काही प्रमाणात शहरी भागातील मल्लांचा ही यात सहभाग दिसून आला. ही संख्या कुस्तीबद्दलचे तरुणातील वाढते आकर्षण स्पष्ट करीत आहे. असे असले तरी अनेक संस्थांनी कुस्तीच्या प्रसार व प्रचारासाठी पुढे यायची गरज असल्याची प्रतिक्रिया स्थानिक कुस्तीगीराकडून व्यक्त करण्यात आली.
पहा फोटोफ्लिक : परत एकदा आखाडा ! ग्रामीण भागात तरुणाईची कुस्तीला साद