विमा स्वीकारण्यासाठी बँकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:17 AM2017-08-02T00:17:32+5:302017-08-02T00:17:32+5:30
पीक विमा भरण्यास शासनाने मुदतवाढ दिल्याचे आदेश दुपारी १२.३० नंतर मिळाले असले तरी जिल्ह्यातील बँकांनी सकाळपासूनच आलेल्या शेतकºयांच्या विमा रकमा स्वीकारण्यास सुरुवात केली. दिवसभरात सर्व बँकांमध्ये विमा रक्कम स्वीकारण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पीक विमा भरण्यास शासनाने मुदतवाढ दिल्याचे आदेश दुपारी १२.३० नंतर मिळाले असले तरी जिल्ह्यातील बँकांनी सकाळपासूनच आलेल्या शेतकºयांच्या विमा रकमा स्वीकारण्यास सुरुवात केली. दिवसभरात सर्व बँकांमध्ये विमा रक्कम स्वीकारण्यात आली.
खरीप हंगामामध्ये पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये विमा भरण्यासाठी शेतकºयांनी गर्दी केली होती. ३० आणि ३१ जुलै रोजी तर शेतकºयांच्या लांबच लांब रांगा बँकेसमोर लागल्या होत्या. अनेक शेतकरी विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहिले होते. विमा भरण्यासाठी मूदतवाढ द्यावी, अशी मागणी जोर धरत होती. अखेर ३१ जुलै रोजी रात्री उशिरा विमा स्वीकारण्यासाठी ५ आॅगस्टपर्यंतची मुदतवाढ दिल्याचे जाहीर करण्यात आले.
प्रत्यक्षात दुपारी १२.३० वाजता जिल्ह्यात हे आदेश प्राप्त झाले. बँकांनीही सकाळपासूनच विमा स्वीकारण्यास सुरुवात केली. मात्र दिवसभरात कोठेही गर्दी, रेटारेटी सारखे प्रकार आढळले नाहीत.
५ आॅगस्टपर्यंत सर्व बॅकांमध्ये शेतकºयांची विमा रक्कम स्वीकारली जाणार आहे. विशेष म्हणजे १ ते ५ आॅगस्ट या काळात स्वीकारलेल्या विम्याची स्वतंत्र नोंद घेण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत.