वाहनधारकांना काटेरी झुडपांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:41+5:302021-03-22T04:15:41+5:30

प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवक द्या गंगाखेड : तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींचा कारभार केवळ ४१ ग्रामसेवकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे एका-एका ग्रामसेवकाकडे ...

Barbed wire barrier to vehicle owners | वाहनधारकांना काटेरी झुडपांचा अडथळा

वाहनधारकांना काटेरी झुडपांचा अडथळा

Next

प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवक द्या

गंगाखेड : तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींचा कारभार केवळ ४१ ग्रामसेवकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे एका-एका ग्रामसेवकाकडे ४-४ ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही कामे करताना ग्रामसेवकांची दमछाक होत आहे. तर दुसरीकडे क्षुल्लक कामांसाठीही ग्रामसेवकाला शोधण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे.

९३५ पथविक्रेत्यांचे प्रस्ताव दाखल

गंगाखेड : प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेंतर्गत शहरातील पथ विक्रेत्यांचे ९३५ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी ६२० पथ विक्रेत्यांची कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. त्यातील २९७ पथ विक्रेत्यांना २९ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

कोविड लसीकरणाला ज्येष्ठांचा प्रतिसाद

मानवत : शासनाने सुरू केलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाला तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून सुरक्षा म्हणून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड प्रतिबंध लस उलब्ध करून दिली आहे.

धूळ व दुर्गंधीने प्रवासी त्रस्त

गंगाखेड : जीर्ण झालेल्या गंगाखेड बसस्थानक इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर बसस्थानक परिसरात खड्डे, धूळ व दुर्गंधीचा सामना करून प्रवाशांना प्रवास पूर्ण करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.

रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी

परभणी : तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सुरू असलेली कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रखडलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांतून केली जात आहे.

सौर कृषीपंप मिळविताना अडचण

परभणी : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत लाभार्थ्यांनी महावितरण व संबंधित कंपनीकडे अनेक तक्रारी करूनही उपयोग होत नाही.

Web Title: Barbed wire barrier to vehicle owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.