परभणी जिल्ह्यातील २० प्रकल्पांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:54 AM2018-11-20T00:54:55+5:302018-11-20T00:55:45+5:30

यावर्षीच्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला नाही़ सद्यस्थितीला येलदरीसह २० प्रकल्पांनी तळ गाठल्याने टंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे़ पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पावसाची शक्यता नसल्याने याच पाणीसाठ्यावर ९ महिन्यांचा काळ काढावा लागणार आहे़

The base reached by 20 projects in Parbhani district | परभणी जिल्ह्यातील २० प्रकल्पांनी गाठला तळ

परभणी जिल्ह्यातील २० प्रकल्पांनी गाठला तळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला नाही़ सद्यस्थितीला येलदरीसह २० प्रकल्पांनी तळ गाठल्याने टंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे़ पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पावसाची शक्यता नसल्याने याच पाणीसाठ्यावर ९ महिन्यांचा काळ काढावा लागणार आहे़
परभणी जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना, करपरा, मासोळी या प्रमुख प्रकल्पांबरोबरच गोदावरी नदीवर बांधलेले पाच बंधारे आणि पाटबंधारे विभागाच्या गाव तलाव व लघु तलावांमधील पाणीसाठ्यावर उन्हाळ्यातील पाणीटंचाईची भिस्त अवलंबून असते़ प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असेल तर भूजल पातळीही स्थिर राहते़ परिणामी पाणीटंचाईची तीव्रता कमी होते़ मात्र यावर्षी पावसाळ्यामध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस कमी झाला आहे़ त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा जमा झाला नाही़ त्याचे परिणाम जिल्हावासियांना भोगावे लागत आहेत़
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार येलदरी प्रकल्पामध्ये सध्या १९५़७९३ दलघमी पाणी उपलब्ध असून, प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्याच्या तुलनेत केवळ ८़८ टक्के पाणी शिल्लक असल्याने टंचाईची दाहकता वाढली आहे़
येलदरी प्रकल्पातून परभणी, जिंतूर, पूर्णा, वसमत या शहरांबरोबरच ग्रामीण भागातील १०० हून अधिक पाणीपुरवठा योजना चालतात़ मात्र प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक नसल्याने या सर्व पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे़ याच प्रकल्पावर अवलंबून असलेल्या सिद्धेश्वर प्रकल्पातही २़६ टक्के पाणी उपलब्ध आहे़ सिद्धेश्वर प्रकल्पातून परभणी शहरासाठी एक पाणी पाळी घेतली असून, पुढचा टप्पा मिळतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़
येलदरी प्रकल्पाबरोबर जिल्ह्यातील इतर १९ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची परिस्थिती वाढत आहे़ या २० ही प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यात गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात ०़४ टक्के, परभणी तालुक्यातील पेडगाव येथील तलावात १२़११ टक्के, अंबेगाव येथील तलावात ०़५४ टक्के , गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव तलावात १८़०६ टक्के, टाकळीवाडी तलावात ८़२२ टक्के, पिंपळदरी तलावात ४़९२ टक्के, दगडवाडी तलावात १़९३ टक्के, डोंगरपिंपळा तलावात ९़७९ टक्के, भेंडवाडी तलावात १६़१८ टक्के, जिंतूर तालुक्यातील चिंचोली तलावात १२़२९ टक्के, आडगाव तलावात १३़१९ टक्के, केहाळ येथील तलावामध्ये ३़२६ टक्के आणि दहेगाव येथील तलावात १४़८५ टक्के पाणी उपलब्ध आहे़
या सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला असून, प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत आहेत़ विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच ही परिस्थिती असून, या प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने हे पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे़
निम्न दुधना, करपराने तारले
जिल्ह्यात २० प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नसला तरी सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पामध्ये १४१़९८० दलघमी (१६़३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे़ तर जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पामध्ये १८़२४३ दलघमी (५७़५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, या दोन्ही प्रकल्पांमुळे थोड्याफार प्रमाणात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे़ याशिवाय ढालेगाव बंधाऱ्यात ४१ टक्के, मुदगल बंधाºयात ३६ टक्के आणि डिग्रस बंधाºयातील ५५ टक्के पाणी आशादायक आहे़
मोठ्या प्रकल्पांमध्ये ९ टक्के पाणी
परभणी जिल्ह्यात पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत ३ मोठे प्रकल्प आहेत़ त्यात निम्न दुधना, येलदरी आणि सिद्धेश्वर प्रकल्पाचा समावेश आहे़ या तिन्ही प्रकल्पांमध्ये मिळून केवळ ९़२३ टक्के पाणी शिल्लक आहे़ त्याच प्रमाणे गोदावरी नदीवरील बंधारे आणि लघु प्रकल्पांची संख्या ७ एवढी असून, या सातही प्रकल्पात केवळ ३१़८१ टक्के पाणी उपलब्ध आहे़ लघु प्रकल्पांमध्ये २२ तलावांचा समावेश असून, या तलावातील पाणीसाठाही समाधानकारक नसल्याने पाण्याचे संकट गंभीर होत आहे़
मुळी बंधारा : पडला कोरडाठाक
गंगाखेड तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़ गंगाखेड शहराला मासोळी मध्यम प्रकल्प आणि मुळी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो़ सद्यस्थितीला मुळीचा बंधारा पूर्णत: कोरडाठाक पडला असून, मासोळी प्रकल्पातही केवळ ७ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे़ मुळी आणि मासोळी या दोन्ही प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे़ त्याच प्रमाणे सोनपेठ तालुक्यातीलच नखातवाडी या तलावात सांडव्याखाली पाणीसाठा असून, हा तलावही कोरडाठाक आहे़ नखातवाडी तलावाची पाणीसाठवण क्षमता १़७६६ दलघमी एवढी असून, या प्रकल्पात सध्या ०़१२७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे हा प्रकल्प कोरडा पडल असून, तालुक्यातील पाण्याचे संकट अधिक गंभीर झाले आहे़
अवैध उपसा थांबवा
प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले असले तरी या पाण्याचा अवैध उपसा होत आहे़ तो थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़

Web Title: The base reached by 20 projects in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.