सौर दिव्यासाठी बॅटऱ्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:53+5:302021-01-09T04:13:53+5:30

कृषीपंप विजेच्या प्रतीक्षेत देवगांवफाटा- शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटारपंप देण्यात आले .यासाठी शेतकऱ्यांनी वीज जोडणी ...

Battery required for solar lamp | सौर दिव्यासाठी बॅटऱ्याची आवश्यकता

सौर दिव्यासाठी बॅटऱ्याची आवश्यकता

Next

कृषीपंप विजेच्या प्रतीक्षेत

देवगांवफाटा- शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटारपंप देण्यात आले .यासाठी शेतकऱ्यांनी वीज जोडणी शुल्क भरलेले आहेत. मात्र बहुतांश शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला अद्यापही वीज जोडणी झालेली नाही. ती त्वरित करावी अशी मागणी होत आहे.

अनेक गावात लाईनमन नाही.

देवगांवफाटा- सेलू तालुक्यात अनेक गावांत लाईनमन नाहीत. जे आहेत त्यांनी कामासाठी खाजगी माणसं लावलेली आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी अडचणी निर्माण होत असून याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

एस.टी.बस मधील आरक्षण नावालाच

देवगांवफाटा- राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंग,महिला,पत्रकार अशा प्रकारे आसन आरक्षित केले असले तरी हे आरक्षण केवळ नावालाच आहे. कारण बसमध्ये आरक्षित जागेवर बसलेले प्रवासी हे अपंग व्यक्ती आले तरी त्यांना जागा देत नाहीत. हे वास्तव चित्र आहे. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.

१४५ सदस्यांची आरटीपिसीआर चाचणी

देवगांवफाटा- सेलू शहरातील लोकमंगलनगर येथे ७ जानेवारी रोजी शिक्षक कर्मचारी यांच्या कुटुंबातील १४५ सदस्यांची आरटीपिसीआर चाचणी घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांचे आदेशानुसार गट शिक्षणाधिकारी गणराज यरमळ यांचे मार्गदर्शनाखाली ही कोराेना चाचणी घेण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे,मुख्याध्यापक राम मैफळ, पद्माकर जाधव,वसंत डासाळकर ,सुधीर डिक्कर,नरेंद्र दिशागत यांची उपस्थिती होती.

Web Title: Battery required for solar lamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.