नामांतराचा लढा अस्मितेचा लढा होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:16 AM2021-01-21T04:16:30+5:302021-01-21T04:16:30+5:30

तथागत मित्र मंडळ पूर्णा आयोजित मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्यानिमित्य १८ जानेवारी रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

The battle of renaming was a battle of identities | नामांतराचा लढा अस्मितेचा लढा होता

नामांतराचा लढा अस्मितेचा लढा होता

Next

तथागत मित्र मंडळ पूर्णा आयोजित मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्यानिमित्य १८ जानेवारी रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमृतराव मोरे यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून भंते पयावंश,प्रा. डॉ. सुरेश वाघमारे,प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे,राजू खरात, राजकुमार येंगडे, प्रा. मोहनराव मोरे,अनिल खर्गखराटे,धम्मा जोंधळे, मुकुंद भोळे, रौफ कुरेशी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात सखाराम साखरे , कॉ. अशोक कांबळे,विजय बगाटे, कैलाशकुमार बलखंडे, गजानन हिवरे, प्रदीप नन्नवरे, बौद्धाचार्य त्रंबक कांबळे यांना कोवीड योद्धा पुरस्कार देन्यात आला. गीताच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे शाहीर विजय सातोरे, धम्म संस्कार विधी मध्ये योगदान देणारे अतुल गवळी, मनोहर उगले, उमेश बराटे यांचा शाल पुष्पहार व सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या अभिवादन सभेला भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष शामराव जोगदंड, माजी तालुकाध्यक्ष एम. यु. खंदारे, बाबाराव वाघमारे, श्रावण यंगडे, गंगाधर खरे, साहेबराव सोनवणे, लक्ष्मण गायकवाड, हरिभाऊ ढाकरके, मुंजाजी गायकवाड, टी. झेड. कांबळे, विजय जोंधळे आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

प्रस्ताविक सुबोध खंदारे व सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तथागत मित्र मंडळाचे शिवा हातागळे,विशाल भुजबळ, किरण सरोदे, प्रकाश गायकवाड, तुशार इंगोले, नितीन भावे, सुमित वावळे, राजू बोधक, संदीप इंगोले आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The battle of renaming was a battle of identities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.