अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:21 AM2021-09-22T04:21:14+5:302021-09-22T04:21:14+5:30
परभणी : राज्यात दलित, मागासवर्गीय व बहुजन समाजावर अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. ॲट्रॉसिटीचे हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. याविरुद्ध ...
परभणी : राज्यात दलित, मागासवर्गीय व बहुजन समाजावर अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. ॲट्रॉसिटीचे हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. याविरुद्ध निर्णायक लढा उभारण्यासाठी रिपब्लिकन सेनेने सज्ज रहावे, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी केले,
येथील बी. रघुनाथ सभागृहात १९ सप्टेंबर रोजी रिपब्लिकन सेनेचा स्वाभिमान मेळावा व पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. राजकुमार सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. युवा जिल्हाध्यक्ष आशिष वाकोडे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष अच्युत घुगे यांनी मेळाव्याची भूमिका विषद केली. मेळाव्याचे उद्घाटक प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांनी सांगितले. देशाची कायदा व सुव्यवस्था बिघडली असून, आणीबाणीसारखी वेळ आली आहे. यासाठी रिपब्लिकन सेना निर्णायक भूमिका घेणार आहे. प्रा. युवराज धसवाडीकर यांनीही मार्गदर्शन केले. या मेळाव्यात यशवंत भालेराव व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले. या मेळाव्यात आठ ठराव मंजूर करण्यात आले. त्यात साकीनाका येथील दलित महिलेवर बलात्कार करून हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी करावी, दलित स्मशानभूमीची सातबारावर नोंद करावी, आदी ठरावांचा समावेश आहे.
मेळाव्यास महेंद्र सानके, अनिल शिरसे, प्रशांत गोडबोले, राम कोरडे, प्रेमलता वाघमारे आदींची उपस्थिती होती. नीलेश डुमणे यांनी सूत्रसंचालन केले. संजय खिल्लारे यांनी आभार मानले.
मेळावा यशस्वीतेसाठी शाहीर चंद्रकांत दुधमल, दा. सा. पुंडगे, सूर्यकांत रायबोले, शरद चव्हाण, चंद्रकांत लहाने, सुधाकर वाघमारे, दीपक ठेंगे, सुबोध काकडे, खमर फुलारी आदींनी प्रयत्न केले.