थकीत वेतनासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:57+5:302021-02-16T04:18:57+5:30

गंगाखेड नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्यापासून वेतन थकीत आहे. हे वेतन तत्काळ ...

Bear agitation of cleaning workers for overdue wages | थकीत वेतनासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

थकीत वेतनासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

Next

गंगाखेड नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्यापासून वेतन थकीत आहे. हे वेतन तत्काळ अदा करत दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन देण्याची व्यवस्था करावी, सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम अदा करावी, १० मार्च १९९३ नंतर सेवेत कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना लाड कमिटीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क लागू करावा, घरकुलासाठी सफाई कामगारांना जागा उपलब्ध करून द्यावी, सातव्या वेतन आयोगाची फरक रक्कम तत्काळ द्यावी आदी विविध मागण्यांसाठी सफाई विभागातील कर्मचाऱ्यांनी १५ फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद करून नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात भुजंग साळवे, उषाबाई खंदारे, अनंता साळवे, बाबू मुंढे, राजकुमार गायकवाड, विजय लांडगे, सुनील साळवे, उत्तम साळवे, भारत सावंत, सुलूबाई साळवे, शिलाबाई सावंत, शांताबाई साळवे, मालनबाई अवचार, गयाबाई साळवे, नंदाबाई डांगे आदींचा सहभाग आहे.

Web Title: Bear agitation of cleaning workers for overdue wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.