कोरोना रूग्णांसाठी शहरामध्ये बेड्‌स उपलब्ध पण पैसे मोजून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:23+5:302021-03-23T04:18:23+5:30

परभणी : कोरोना रुग्णांसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बेडस्‌ उपलब्ध असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयांमध्येच उपचार घेणाऱ्यांनी ...

Beds available in the city for Corona patients but for a fee! | कोरोना रूग्णांसाठी शहरामध्ये बेड्‌स उपलब्ध पण पैसे मोजून !

कोरोना रूग्णांसाठी शहरामध्ये बेड्‌स उपलब्ध पण पैसे मोजून !

Next

परभणी : कोरोना रुग्णांसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बेडस्‌ उपलब्ध असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयांमध्येच उपचार घेणाऱ्यांनी संख्या अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी बेडस्‌ उपलब्ध मात्र पैसे मोजून अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेष म्हणजे नव्याने नोंद होणारी सर्वच रुग्ण परभणी शहरात उपचार घेत आहेत. अशा परिस्थितीत बेडची संख्या कमी असून खाजगी रुग्णालयांकडे रुग्णांचा ओढा आहे. रविवारी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ८३२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी शहरातील आयटीआय हाॅस्पिटलमध्ये १३४ रुग्ण दाखल आहेत. तर दुसरीकडे शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २०२ एवढी आहे. त्यामुळे जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार होत असून शासकीय रुग्णालयात मात्र उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाला शासकीय रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध रुग्णांवर पुरेशा सुविधा देण्याची आवश्यक निर्माण झाली आहे. तरच शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांचा कल वाढेल.

प्रशासनाकडे माहितीचा अभाव

खाजगी रुग्णालयात किती रुग्णांवर उपचार केले जात आहेत, याची माहिती उपलब्ध असली तरी प्रत्यक्षात ऑक्सीजन बेडवर किती रुग्ण उपचार घेत आहेत, या संदर्भात माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले.

Web Title: Beds available in the city for Corona patients but for a fee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.