सेलू तालुक्यात ५ हजार ७४७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:01+5:302020-12-11T04:44:01+5:30
वंचित शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा- डख महात्मा जाेतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेंतर्गत कर्ज माफ झालेल्या व नवीन कर्जासाठी पात्र ...
वंचित शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा- डख
महात्मा जाेतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेंतर्गत कर्ज माफ झालेल्या व नवीन कर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे पीक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे या वंचित शेतकऱ्यांना आता तरी तातडीने कर्ज वाटप करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश डख यांनी केली आहे. खरीप हंगामात केवळ ३ कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ९ कोटी रुपयांचे पीक कर्ज अद्यापही वाटप करण्यात आलेले नाही. ही चुकीची बाब आहे, असे ही ते म्हणाले.
जिल्हा बँकेपेक्षा राष्ट्रीयकृत बँकेत पीक कर्जाची रक्कम अधिक मिळते. त्यामुळे पीक कर्ज घेण्यासाठी दत्तक असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेकडे शेतकऱ्यांचा कल असतो. ज्यांची कर्जमाफ झाली. अशा शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना बेबाक प्रमाणपत्र दिले आहे.
भारत इक्कर, तालुका तपासणी, जिल्हा बँक सेलू