भारिप बहुजन महासंघाचे गंगाखेड तहसीलसमोर घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:52 PM2018-04-03T16:52:52+5:302018-04-03T16:52:52+5:30
भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज दुपारी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
गंगाखेड ( परभणी ): भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज दुपारी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
भीमा कोरेगाव हल्ल्यातील मुख्य सूत्रधार मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना अटक करावी व बहुजन समाज बांधवांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. ईतर मागासवर्गीय, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी. अट्रासिटी संदर्भात पुर्नविचार याचिका तात्काळ सुनावणीस घेऊन सर्वोच्च न्यायालयाचा मारक निर्णय रद्द करून अनुसूचित जाती जमातीचे घटनात्मक संरक्षण कायम ठेवावे आदी मागण्यांचे निवेदन सादर केले
या घंटानाद आंदोलनास तालुकाध्यक्ष मिलिंद कांबळे, राजेभाऊ साळवे, संदिप भालेराव, राजेभाऊ पंडित, अड. गौतम अवचार, अड. राम गायकवाड, विलास घनघाव, केवळ साळवे, विलास मस्के, लिंबाजी रायभोळे, कपिल खंदारे, सुरेश पारवे, रवि रायभोळे, अनिलसिंग चव्हाण, तरुण व्हावळे, दिपक पारवे, शांतीदुत साबणे, करण मुंडे, अनंत साळवे, प्रदिप पारवे, कृष्णा कांबळे, पवन भालेराव, गौतम गाढे, पंडितराव भालेराव आदीसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.