आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर; ब्रिटिश संसदेत होणार गौरव! 

By ज्ञानेश्वर भाले | Published: May 9, 2023 04:18 PM2023-05-09T16:18:11+5:302023-05-09T16:19:29+5:30

महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम, नोकरी मेळावे, दिव्यांगांसाठीचे काम करून त्यांनी सरकारी योजना घरोघरी पोहोचविल्या आहेत.

'Bharat Gaurav Award' announced to MLA Meghna Bordikar; Glory will be in the British Parliament! | आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर; ब्रिटिश संसदेत होणार गौरव! 

आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर; ब्रिटिश संसदेत होणार गौरव! 

googlenewsNext

परभणी : लंडनमधील भारतीयांतर्फे देण्यात येणारा 'भारत गौरव पुरस्कार' यंदा आ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांना जाहीर झाला आहे. इंग्लंडची राजधानी लंडनमधील ब्रिटिश संसदेत 'हाउस ऑफ कॉमन्स'मध्ये १२ मे रोजी होणाऱ्या सोहळ्यात संबंधित पुरस्कार देण्यात येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायत्री परिवाराचे मुख्य चिन्मय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ब्रिटिश संसदेत हाेणार असून, मागील दहा वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो.

आ. बोर्डीकर यांनी सामाजिक, जलसंधारण आणि पर्यावरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोर्डीकर यांनी पर्यावरण विषयक कामांना न्याय दिला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम, नोकरी मेळावे, दिव्यांगांसाठीचे काम करून त्यांनी सरकारी योजना घरोघरी पोहोचविल्या आहेत.

या पुरस्कार सोहळ्यात डॉ. नरेश त्रेहान, अंकित जालान, शास्त्रज्ञ सीईआरएन अर्चना शर्मा, पोलंडच्या अमित लाथ यांच्यासह जपान, उझबेकिस्तान, भारत, यूएसए, यूके, युरोप, न्यूझीलंड, फ्रान्ससह जगभरातील २० देशांतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीयांना हा पुरस्कार ब्रिटिश संसदेत वितरण होणार आहे. याआधी 'भारत गौरव पुरस्कार' आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, अभिनेते मनोज कुमार, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, जैन संत पुलक सागर, आचार्य लोकेश मुनी, गूगलचे सीईओ संजय गुप्ता, दिवंगत मेजर ध्यानचंद, जी-मेलचे शिवा अय्यादुराई, स्व. निरजा भानोत, गौर गोपालदास, सीमा तापडिया यांना देण्यात आला आहे.

Web Title: 'Bharat Gaurav Award' announced to MLA Meghna Bordikar; Glory will be in the British Parliament!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.