भास्कर खेबाळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:16 AM2021-01-22T04:16:56+5:302021-01-22T04:16:56+5:30
भास्कर खेबाळे हे १ मे १९९४ रोजी दिल्ली पोलीस दलात रुजू झाले होते. २७ वर्षे त्यांनी दिल्ली पोलीस दलात ...
भास्कर खेबाळे हे १ मे १९९४ रोजी दिल्ली पोलीस दलात रुजू झाले होते. २७ वर्षे त्यांनी दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल या पदावर सेवा बजावली. १८ जानेवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास कर्तव्यावर असताना भास्कर खेबाळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, नंदिनी ही मुलगी, अभिजीत हा मुलगा, एक भाऊ, ३ बहिणी असा परिवार आहे. येथील खानापूर भागातील स्मशानभूमीत २१ जानेवारी रोजी भास्कर खेबाळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दिल्ली येथील त्यांचे सहकारी विकास कोसे, सुधीर भराडे, धीरेंद्र पंडित, विकास अंभोरे, भास्कर वाघमारे, नागसेन सिनगारे, आत्माराम श्रीपाद, सखाराम शिंदे, भानुदास जाधव, मधुकर अदमाने, राजन कांबळे, मोहन पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने हे.कॉ.किरवले, मानेबोईनवाड, पठाण, शिंदे, पोलीस शिपाई काळे, चाटे, धरणे, खंदारे, आडे, शिंदे आदींनी सलामी दिली.