भीमा - कोरेगाव प्रकरणी भीमप्रहारचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:41+5:302021-01-01T04:12:41+5:30
परभणी : भीमा - कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, यासह इतर मागण्यांसाठी ...
परभणी : भीमा - कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, यासह इतर मागण्यांसाठी भीमप्रहार संघटनेच्यावतीने ३१ डिसेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भीमप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॅ. प्रवीण कनकुटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. भीमा - कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, निर्दोष विचारवंत, शाहीर यांना मुक्त करावे, शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, भीमा-कोरेगाव दंगलीचा तपास एसआयटीमार्फत करावा, मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात विश्वजीत वाघमारे, ॲड. विष्णू ढोले, अविष्कार लोखंडे, गौतम जमदाडे, बापू धापसे, राहुल जाधव, मानव मुक्ती मिशनचे शेख रफीक, सज्जू लाला मित्रमंडळाचे आसेफ लाला, पँथर्स आर्मीचे आशिष मुंडे, भीमशक्ती संघटनेचे सतीश भिसे, आनंद वहिवाळ, अफजल बेग, वंचितच्या वंदनाताई जोंधळे, आम आदमी पक्षाचे शकील केजरीवाल, संभाजी ब्रिगेडचे नितीन देशमुख आदींनी सहभाग घेतला.