परभणीतील बसपोर्टचे आज भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:52 PM2019-08-13T23:52:31+5:302019-08-13T23:53:46+5:30
एअरपोर्टच्या धर्तीवर परभणीत बसपोर्ट उभारले जात असून १४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एअरपोर्टच्या धर्तीवर परभणीत बसपोर्ट उभारले जात असून १४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे.
शहरातील बसस्थानकाची इमारत जुनी झाल्याने या ठिकाणी अद्ययावत असे बसस्थानक उभारावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार बसपोर्ट उभारणीसाठी रावते यांनी निधी मंजूर करुन दिला. गुरुवारी या कामास सुरुवात होणार आहे. सकाळी १० वाजता नूतन इमारतीचे भूमिपूजन रावते यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला राठोड, खा.बंडू जाधव, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.रामराव वडकुते, आ.बिप्लव बजोरिया, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, आ.मोहन फड, महापौर मीनाताई वरपूडकर, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आ.डॉ.राहुल पाटील, विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी केले आहे.
१३ कोटींचा निधी मंजूर
४नवीन बसपोर्टच्या उभारणीसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी ४ लाख, ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नवीन बसस्थानकाच्या प्रारुप आराखड्यात अद्ययावत असे १६ गाळे.
४ दोन अनलोडींग प्लॅटफॉर्म, इमारतीच्या दोन्ही बाजुस प्रसाधनगृह, उपहारगृह, ९ व्यापारी गाळे, स्वतंत्र पोलीस. हिरकणी कक्ष, पार्सल कक्ष, जेनरिक मेडिकल, नियंत्रण कक्ष, एटीएम.
४ आरक्षण कक्ष, प्रतीक्षालय, महिला वाहक-चालकांसाठी विश्रांतीगृह, वाहनतळ, सुरक्षा कक्ष आदी सुविधा राहतील. पहिल्या मजल्यावर पुरुष वाहक-चालकांसाठी विश्रांतीगृह, बहुउद्देशीय सभागृह. ८ विश्रांतीगृह, व्यायामशाळा.
४ पुरुष शयनगृह आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दोन वर्षाच्या मुदतीत ही इमारत बांधली जाणार असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.