वीज मीटर नसताना ६० हजार रुपयांचे दिले बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:51+5:302021-03-21T04:16:51+5:30
जिंतूर तालुक्यातील कोक येथील शेख आजम शेख इब्राहीम यांच्या नावाने महावितरण कंपनीचे कोणतेही वीज मीटर नाही. असे असताना महावितरण ...
जिंतूर तालुक्यातील कोक येथील शेख आजम शेख इब्राहीम यांच्या नावाने महावितरण कंपनीचे कोणतेही वीज मीटर नाही. असे असताना महावितरण कंपनीने मात्र शेख आजम यांना ६० हजार रुपयांचे वीज देयक दिले आहे. या प्रकारामुळे हा शेतकरी गोंधळून गेला आहे. या प्रकरणी शेख आजम शेख इब्राहिम यांनी बोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्राच्या उपअभियंत्यांकडे रीतसर तक्रार केली आहे. सध्या महावितरण कंपनीने वसुली अभियान सुरू केले असून या अंतर्गत गावात अनेकांना मीटर नसतानाही अव्वाच्या सव्वा बिले दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन चौकशी करावी व हे बिल रद्द करावे, अशी मागणी शेख आजम शेख इब्राहिम यांनी केली आहे.