भाजपचा नगरपालिकेवर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:33 AM2021-02-21T04:33:03+5:302021-02-21T04:33:03+5:30

गंगाखेड शहराला ८ ते १० दिवसाआड होत असलेला अशुद्ध पाणीपुरवठा बंद करून शहरवासीयांना दररोज शुद्ध पाणीपुरवठा करावा, उन्हाळा सुरू ...

BJP's strike on the municipality | भाजपचा नगरपालिकेवर धडकला मोर्चा

भाजपचा नगरपालिकेवर धडकला मोर्चा

Next

गंगाखेड शहराला ८ ते १० दिवसाआड होत असलेला अशुद्ध पाणीपुरवठा बंद करून शहरवासीयांना दररोज शुद्ध पाणीपुरवठा करावा, उन्हाळा सुरू होण्यापूर्वी गोदावरी नदीपात्रात तात्पुरता बंधारा बांधून वाहून जाणारे पाणी अडवावे. मुख्य बाजार पेठेतील पोलीस ठाणे ते पोस्ट ऑफिस कार्यालय रस्ता दुरुस्त करावा, शहरातील नित्कृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी, आदी विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भगवती चौक येथून नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मुख्य रस्त्याने निघालेला हा मोर्चा नगरपालिका कार्यालयात धडकल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी सोबत आणलेले नळाचे गढूळ पाणी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना पियायला द्यायचे आहे. त्यांनीच निवेदन स्वीकारायला यावे, अशी मागणी करीत त्यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याऐवजी उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, पाणीपुरवठा अभियंता मयूरी पाटील व कार्यालयीन अधीक्षक शेख अफजलोद्दीन हे निवेदन स्वीकारायला आले. त्यानंतर माठावर नाव टाकून तयार केलेल्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला नळाला आलेले अशुद्ध पाणी पाजून निवेदन सादर केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे, व्यंकटराव तांदळे, बाबासाहेब जामगे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, तालुकाध्यक्ष कृष्णा सोळंके, शहराध्यक्ष श्रीनिवास मोटे, महिला आघाडी शहराध्यक्ष रूपाली जोशी, रेखा पेकम, पदमजा कुलकर्णी, आदिनाथ मुंडे, तुकाराम आय्या, अरुण मुंडे, गोविंद रोडे, सविता राखे, बाळासाहेब गव्हाणकर, रेणुका असमार, कृष्णा कवठेकर, रामेश्वर अळनुरे, रवी जोशी, श्रीपाद कोद्रीकर, भास्कर जाधव, कमलबाई शेटे, अनिता कुलकर्णी, प्रभाकर लंगोटे, आदींसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: BJP's strike on the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.