रस्त्यावरील खड्ड्यात लावली बेशरमाची रोपे; जिंतूर येथे युवक काँग्रेसकडून खड्डेमुक्त घोषणेचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 08:00 PM2017-12-16T20:00:27+5:302017-12-16T20:00:42+5:30
येथील युवक काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांच्या महाराष्ट्र खड्डामुक्त घोषणेचा निषेध करून शनिवारी जिंतूर तालुक्यातील शेख पाटीजवळ जिंतूर- परभणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची रोपे लावून अनोखे आंदोलन केले़
परभणी- येथील युवक काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांच्या महाराष्ट्र खड्डामुक्त घोषणेचा निषेध करून शनिवारी जिंतूर तालुक्यातील शेख पाटीजवळ जिंतूर- परभणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची रोपे लावून अनोखे आंदोलन केले़
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही़ सर्व रस्ते खड्डेमुक्त करू, असे जाहीर केले होते़ मात्र १५ डिसेंबरनंतरही जिंतूर- परभणी या राज्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत़ त्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने नागसेन भेरजे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी जिंतूर- परभणी या राज्य महामार्गावर जिंतूर तालुक्यातील शेख पाटीजवळ रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची रोपे लावून बांधकामंत्री पाटील यांनी केलेल्या घोषणेचा निषेध करून अनोखे आंदोलन केले़ या आंदोलनात सुहास पंडीत, सुरेश देसाई, गजानन देशमुख, अमोल ओझलवार, असेफ मास्टर, प्रणित काजे, शेख दिलावर, किसन काळे, रवि देशमुख, हितेश वाघमारे आदी युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांचा समावेश होता़