जलालपूर पाटीवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:21 AM2021-09-22T04:21:07+5:302021-09-22T04:21:07+5:30
जिल्ह्यात या वर्षी अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. तसेच पावसाचा अनियमितपणाही आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांवर ...
जिल्ह्यात या वर्षी अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. तसेच पावसाचा अनियमितपणाही आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांवर आले आहे. असे असताना प्रशासनाने मात्र काही मंडळांनाच २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसानीची सरसकट मदत घ्यावी तसेच २५ टक्के अग्रीम रक्कमही सर्व शेतकऱ्यांना द्यावी, ई पीक पाहणीचा कार्यक्रम रद्द करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी २१ सप्टेंबर रोजी जलालपूर मांडवा पाटीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष केशव आरमळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात केशव आरमळ यांच्यासह अच्युत रसाळ, रमेशराव कोके, सुशील रसाळ, अक्षय रसाळ, अजय रसाळ, बाळासाहेब रसाळ, गणपत रसाळ, प्रवीण चांदणे, वैभव रसाळ, सागर रसाळ, आकाश रसाळ, योगेश आवखे, बालाजी सुक्रे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.