मागासवर्गीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी आखला आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:23 AM2021-08-19T04:23:02+5:302021-08-19T04:23:02+5:30
परभणी : मागासर्गीय समाजातील व्यक्तींचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास घडवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी येथील समाज कल्याण विभागाच्या वतीने ...
परभणी : मागासर्गीय समाजातील व्यक्तींचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास घडवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी येथील समाज कल्याण विभागाच्या वतीने योजनायुक्त कृती आराखड्याची आखणी करण्यात आली असून, स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते या आराखड्याचे विमोचन करण्यात आले.
यावेळी आ.डॉ. राहुल पाटील, आ.मेघना बोर्डीकर, जि.प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, सीईओ शिवानंद टाकसाळे, जि.प. उपाध्यक्ष अजय चौधरी, सहाय्यक आयुक्त सचिन कवले, समाजकल्याण निरीक्षक तुकाराम भराड, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक एल.एस. गायके, नागेश गिराम आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी सांगितले, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक न्यायाच्या दृष्टीतून सर्वसमावेशक व शाश्वत विकास करण्यासाठी या कृती आराखड्याची आखणी केली आहे. या पुस्तिकेत जिल्ह्यातील ऐतिहासिक, भौगोलिक, वनस्पती, प्राणी, पीक पद्धती, जलसिंचन, वाहतूक, शैक्षणिक माहितीसह विविध योजना व त्याचे बदलते स्वरूप, उद्दिष्टपूर्ती याबाबतची सर्वंकष माहिती असल्याचे कवले यांनी सांगितले.
फोटो ओळ : समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने तयार केलेल्या मागासवर्गीय योजनांच्या कृतीआराखडा पुस्तिकेचे विमोचन करताना जिल्हाधिकारी आंचल गोयल. समवेत आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर, जि.प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, सीईओ शिवानंद टाकसाळे
उपाध्यक्ष अजय चौधरी, सहाय्यक आयुक्त सचिन कवले, तुकाराम भराड आदी.