बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:18 AM2020-12-31T04:18:06+5:302020-12-31T04:18:06+5:30

पत्नीसोबत वाद झाल्याने २८ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास पत्नी घरातून निघून गेल्याने प्रकाश भुजंग ढवळे (वय ३२), ...

The body of a missing youth was found | बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

Next

पत्नीसोबत वाद झाल्याने २८ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास पत्नी घरातून निघून गेल्याने प्रकाश भुजंग ढवळे (वय ३२), रा. महात्मा फुलेनगर, गंगाखेड हे पत्नी हरवल्याची तक्रार देण्यासाठी त्यांच्या आईसोबत पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर दुपारी बेपत्ता झाले होते. याप्रकरणी २९ डिसेंबर रोजी त्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून प्रकाश भुजंग ढवळे हरवल्याची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात घेण्यात आली होती. त्यांचा शोध सुरू असतानाच ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात नृसिंह मंदिरापासून काही अंतरावर पाण्यात पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर जमादार रंगनाथ देवकर यांनी पाण्यातील मृतदेह बाहेर काढला असता हा मृतदेह बेपत्ता असलेल्या प्रकाश ढवळे यांचा असल्याची ओळख पटली. त्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून जमादार रंगनाथ देवकर, पो. ना. एकनाथ आळसे, अमजद खान पठाण यांनी पंचनामा व शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी देवराव जंगले यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: The body of a missing youth was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.