नानलपेठ हद्दीतील दोघांना केले हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:42+5:302021-08-29T04:19:42+5:30
नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळी प्रमुख अभिजीत उर्फ नारायण बालासाहेब कठाळे (रा.नागराज कॉर्नर, सुभाष रोड) व सदस्य बबन ...
नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळी प्रमुख अभिजीत उर्फ नारायण बालासाहेब कठाळे (रा.नागराज कॉर्नर, सुभाष रोड) व सदस्य बबन उर्फ बाबाराव रामभाऊ कल्याणकर, विकास बालासाहेब आगलावे (दोन्ही रा.गवळी गल्ली) यांनी २००९ पासून आजतागायत टोळीतील सदस्यांमार्फत वैयक्तिक व एकत्रितपणे ७ गुन्हे घडवून आणले तसेच सर्वसामान्यांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण केला. या सर्व घटनेवरून शहराचे सहायक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी टोळीतील सर्व सदस्यांना हद्दपार करण्याच्या शिफारशीसह अहवाल सादर केला. या हद्दपार प्रकरणाची सुनावणी २४ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली. यातील दोघे नामे अभिजीत उर्फ नारायण बालासाहेब कठाळे यास सहा महिने तर सदस्य विकास बालासाहेब आगलावे यास दोन महिन्यांच्या कालावधीकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशाप्रमाणे नानलपेठ पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या अधीनस्थ पथकाने दोन्ही हद्दपार केलेल्या आरोपींना मंठा (जि.जालना) येथे नेऊन सोडले आहे. दरम्यान, आजतागायत १० महिन्याच्या कालावधीत एकूण १६ जणांना हद्दपार केले आहे.