पाथरी तालुक्यातील दोघांना केले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:44+5:302021-09-25T04:17:44+5:30

पाथरी पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या खेर्डा गावातील रामचंद्र नामदेव आमले, दगडू रामभाऊ आमले यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे त्यांना हद्दपार ...

Both were deported from Pathri taluka | पाथरी तालुक्यातील दोघांना केले हद्दपार

पाथरी तालुक्यातील दोघांना केले हद्दपार

Next

पाथरी पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या खेर्डा गावातील रामचंद्र नामदेव आमले, दगडू रामभाऊ आमले यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे त्यांना हद्दपार करण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्यामार्फत पाथरीच्या उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. याची सुनावणी उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांच्यासमोर होऊन त्यांनी दोघांना हद्दपार करण्याचे आदेश १७ सप्टेंबर रोजी दिले. यामध्ये परभणी जिल्हा तसेच पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीलगत असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी, माजलगाव तालुका तसेच जालना जिल्ह्यातील परतूर व आष्टी या क्षेत्रांतून हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले. त्यानुसार २३ सप्टेंबर रोजी पाथरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत राऊत, इमाइदुल्ला पठाण यांनी रामचंद्र नामदेव आमले व दगडू रामभाऊ आमले यांना हद्दीबाहेर जालना जिल्ह्यातील मंठा येथे नेऊन सोडले आहे.

Web Title: Both were deported from Pathri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.