परीक्षेच्या कामकाजावर शिक्षकांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:00+5:302021-03-18T04:17:00+5:30
१८ वर्षांपासून विनावेतन ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना आजपर्यंत त्यांचा हक्काचा पगार मिळाला नाही. १५ नोव्हेंबर २०११ ते १४ जून ...
१८ वर्षांपासून विनावेतन ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना आजपर्यंत त्यांचा हक्काचा पगार मिळाला नाही. १५ नोव्हेंबर २०११ ते १४ जून २०१४ नुसार अनुदान वितरण सूत्र लागू करून निधी वितरित करावा, १२ फेब्रुवारी २०२१ व १५ फेब्रुवारी २०२१ मधील त्रुटीची पूर्तता करणाऱ्या शाळा व २४ फेब्रुवारी २०२१ रोजी कोल्हापूर व मुंबई विभागाचा निधीची पुरवणीत समावेश करून तात्काळ निधी वितरित करावा, सर्व अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा घोषित कराव्यात, विनाअनुदानित व अंशत अनुदानित शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती लागू करावी, सेवा संरक्षण द्यावे, या शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत बहिष्काराचा निर्णय मागे घेतला जाणार नाही, असे शिक्षक समन्वय संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात कळविले आहे.