दुसऱ्या दिवशीही नियमाचा भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:14+5:302021-07-05T04:13:14+5:30
परभणी शहरात मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या डेल्टा प्लसचा धोका ओळखून नवीन निर्बंध लागू केले. यामध्ये सोमवार ते शुक्रवार ...
परभणी शहरात मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या डेल्टा प्लसचा धोका ओळखून नवीन निर्बंध लागू केले. यामध्ये सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सर्व बाजारपेठ खुली ठेवण्याचे आदेश काढले तर शनिवार-रविवार भाजीपाला व किराणा साहित्य वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबत लाँकडॉून जाहीर केला. मात्र, शनिवारी व रविवारी दोन्ही दिवशी या विकेंड लाँकडाऊनचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढलेल्या आदेशाचे नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पालन केले नसल्याचे दिसून आले.
महापालिका पथक गायब
महापालिका पथक या दोन दिवसात कुठेही कारवाई करताना दिसून आले नाही. केवळ लसीकरण आणि कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी, मानधन तत्त्वावरील कर्मचारी पूर्ण करीत आहेत. या व्यतिरिक्त प्रभाग समितीच्या सर्व फिरत्या पथकांची दोन दिवसात कुठेही कारवाई झाली नसल्याचे पहावयास मिळाले. यामुळे नागरिक आणि व्यापारी बिनधास्त फिरत असल्याचे दिसून आले.