नोटबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:18 AM2021-07-30T04:18:46+5:302021-07-30T04:18:46+5:30

मागील दोन वर्षांपासून जिल्हा कोरोनाच्या संसर्गाने संकटाच्या सावटाखाली आहे. संचारबंदीमुळे सर्व व्यवहार बंद होते. पण लाचखोरी काही थांबलेली नाही. ...

Bribery is rampant even in denominations and curfews | नोटबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात

नोटबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात

Next

मागील दोन वर्षांपासून जिल्हा कोरोनाच्या संसर्गाने संकटाच्या सावटाखाली आहे. संचारबंदीमुळे सर्व व्यवहार बंद होते. पण लाचखोरी काही थांबलेली नाही. संचारबंदीच्या दोन वर्षात विविध विभागाचे २२ अधिकारी, कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या गळाला लागले. महसूल, पोलीस, महावितरण, ग्रामविकास, सहकार अशा सगळ्याच विभागात लाच मागण्याचे प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे, लाचेच्या रकमेतही अनेक पटींनी वाढ झाली आहे. एकंदर नोटाबंदी असो की संचारबंदी लाचखोरीला कुठलाच फरक पडत नसल्याची बाब दिसून आली.

महसूल विभाग सर्वात पुढे

या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई केली आहे. त्यात महसूल विभाग सर्वात पुढे आहे. या विभागातील अधिकारी-कर्मचारी लाचेची मागणी करताना आणि स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांच्या शेतीच्या फेरफार प्रकरणांमध्ये लाच स्वीकारली जात असल्याचे तीनही प्रकरणांवरून स्पष्ट होत आहे.

एक हजार रुपयांपासून दहा लाखांपर्यंत

बिल मंजूर करण्यासाठी....

सोलार पंपाच्या आयसीआर अर्जावर सही करून बिल मंजूर करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी...

अपघात प्रकरणातील ऑडिओ क्लिपवरून गुन्हा दाखल न करता सहकार्य करण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी करून त्याचा पहिला हप्ता म्हणून १० लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

वर्ष लाच प्रकरणे

२०१६ २०

२०१७ २४

२०१८ १८

२०१९ १४

२०२० १३

२०२१ (जुलैपर्यंत) ९

Web Title: Bribery is rampant even in denominations and curfews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.